देशातील १८ जिल्ह्यांत कोरोना रुग्ण वाढले, केंद्राचा इशारा

0
35

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल देशभरातील १८ जिल्ह्यांत कोरोनाचे नवे रुग्ण वाढत असल्याचा इशारा दिला. त्यात १० जिल्हे केरळमधील तर तीन महाराष्ट्रातील असल्याचे सांगितले. आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी, देशातील ५७ जिल्ह्यांमध्ये दररोज १०० रुग्ण आढळत आहेत. तसेच देशातील १८ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत.

यामध्ये केरळमधील १०, महाराष्ट्रातील ३, मणिपूरमधील २, अरुणाचल, मेघालय आणि मिझोरामच्या १-१ जिल्ह्यांचा समावेश असल्याचे सांगितले. तसेच देशातील ४४ जिल्ह्यांत १०% पेक्षा जास्त पॉझिटीव्हिटी दर आहे. श्री. अग्रवाल म्हणाले की, अजून दुसरी लाट संपलेली नाही. देशात आतापर्यंत ४७.८५ कोटी लशीचे डोस देण्यात आले आहेत, त्यापैकी ३७.२६ कोटी जणांना पहिला डोस मिळाला आहे आणि १०.५९ कोटी जणांना दोन्ही मिळाले आहेत.