पर्वरीतील एटीएम चोरीप्रकरणी अटक केलेल्या टोळक्याने देशभरात चार एटीएमची चोरी केल्याचे उघड झाले आहे. पर्वरी गोवा येथे एटीएम चोरी प्रकरणातील मुख्य संशयित रूस्तम सुहाग याच्याकडून पोलिसांनी पिस्तूल, ८ जिवंत काडतूस, रोख ३ लाख ३३ हजार रुपये आणि चोरीची मोटरसायकल जप्त केली आहे.
दिल्ली विमानतळावर दोघांना अटक
या माहितीनुसार स्थानिक पोलिसांनी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एटीएम चोरी प्रकरणी सफीकुल मुल्ला आणि मोहम्मद साफी या दोघांना ताब्यात घेतले. त्याच्याकडे रोख ३३ हजार रुपये आढळून आले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी पूर्व दिल्लीतील भागात लपून बसलेल्या मुख्य संशयित आरोपी रूस्तम याला पोलिसांना शरण येण्याची सूचना केली. संशयित रूस्तम याने पोलिसावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळी झाडली. यात रूस्तमच्या पायाला जखम झाली. त्याला दिल्लीतील इस्पितळात दाखल करण्यात आला आहे. संशयितांनी बांगलादेशात पळून जाण्याचा ठरविले होते.
जुलै २०१९ मध्ये कोलवाळमध्ये झालेल्या चोरीप्रकरणातही संशयितांचा हात असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.