देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसत असून गेल्या २४ तासांत देशात दोन महिन्यांनंतर कोरोनाचे सर्वात कमी नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तसेच बळींचीही संख्या कमी झाले असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. देशात गेल्या २४ तासांत १ लाख १४ हजार ४६० नवीन रुग्ण आढळले असून २६७७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यापूर्वी कोरोना रुग्णांची इतकी कमी संख्या ही ५ एप्रिल रोजी ९६,९८२ इतकी नोंदवली गेली होती. तसेच सलग २४ व्या दिवशी मोठ्या प्रमाणात कोरोनामुक्त झाले असून एकूण २ कोटी ६९ लाख ८४ हजार ७८१ जण कोरोनातून बरे झाले आहेत. देशात सध्या १४ लाख ७७ हजार ७९९ इतके सक्रिय रुग्ण आहेत. शनिवार दि. ५ जूनपर्यंत देशात २३ कोटी १३ लाख २२ हजार नागरिकांना कोरोनाची लस दिली गेली आहे.