गोवा विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेले असून, त्यांचे राष्ट्रीय नेते सातत्याने गोवा दौरा करून राजकीय धुरळा उडवून देत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे गोवा निवडणूक निरीक्षक देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी दुपारी पुन्हा एकदा गोवा दौर्यावर येत आहेत. त्यांचा हा दौरा दोन दिवसांचा असणार आहे. निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा हा दुसरा दौरा आहे. यापूर्वी झालेल्या दौर्यांत त्यांनी अमित शहांसमवेत गोव्यातील मंत्री-आमदार आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता.