विकसनशील देशांना मदत मिळावी : मोदी

0
21

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ग्लासगो येथे आयोजित संयुक्त राष्ट्र वातावरण बदल संमेलनात (सीओपी २६) भाग घेतला. जलवायू परिवर्तनामुळे विकसनशील देशांवर सर्वात जास्त प्रभाव पडला आहे. त्यामुळे या देशांना जागतिक मदत मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन यावेळी मोदींनी केले. भारतासह अनेक विकसनशील देशांच्या कृषी क्षेत्रासाठी जलवायू परिवर्तन हे मोठे आव्हान ठरले आहे. त्यामुळे जलवायू परिवर्तन अनुकूलनविषयक अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकात समाविष्ट करणे गरजेचे आहे, जेणेकरून भावी पिढी याबाबत जागरुक राहील, असेही मोदी म्हणाले.