काल शुक्रवार दि. ८ रोजी सकाळी कासारवर्णे आरोग्य केंद्राजवळ ऍक्टिवासह (जीए ११ सी २९४४) श्याम गावस (रा. चांदेल) हे कालव्यामध्ये पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. सकाळी त्यांचा मृतदेह दिसल्यानंतर स्थानिक नागरिक नवनाथ नाईक यांनी दूरध्वनीवरून पेडणे अग्निशामक दलाला कळवले. त्यानंतर त्वरित अग्निशामक दलाचे अधिकारी व जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रथम दोरखंडाच्या साहाय्याने ऍक्टिवा कालव्यातून बाहेर काढली. त्यानंतर बुडालेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह पेडणे पोलिसांच्या ताब्यात दिला.