दुचाकीचालकाचा मृत्यू

0
9

बेती येथे पर्यटक बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी पावणे अकरा वाजता कांदोळी मार्गे जाणाऱ्या बसखाली (क्र. जीए-08-यू-4785) दुचाकी (क्र. जीए-03-एएक्स-1822) अचानक आल्याने दुचाकीचालक सदानंद सुर्लीकर (61, रा. बेती) यांचा मृत्यू झाला.