दिवाळीत फटाके लावण्यावर नियंत्रणासाठी जनजागृतीची सूचना

0
376

>> प्रदूषण नियंत्रण मंडळाला केंद्राचे निर्देश

दिवाळी सणाच्या दिवसात गोव्यात कमी फटाके लावले जावेत यासाठी लोकांमध्ये जागृती करण्याची सूचना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला केली आहे.
या काळात वायू व ध्वनी प्रदूषणात वाढ होण्याची शक्यता असल्याने त्यावर लक्ष ठेवण्याची वेळोवेळी तपासणी करण्याची सूचनाही गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला करण्यात आली आहे. तसेच त्यासंबंधीचा अहवाल ३० नोव्हेंबरपर्यंत आपणाला पाठवण्यात यावा, असेही केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला सूचित केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हे केले जात असल्याचेही केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने म्हटले आहे. दिवाळीच्या आदत्या दिवशी व दिवाळीच्या दुसर्‍या दिवशीचा वायू प्रदूषणाचा अहवाल सादर करण्याचीही सूचना मंडळाने केली आहे.
लोकांनी मोठ्याप्रमाणात फटाके लावू नयेत यासाठी लोकांमध्ये जागृती घडवून आणावी अशी सूचनाही केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला केली आहे.
दरम्यान, ध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) कायदा, २००० कायद्यानुसार रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत फटाके लावण्यावर बंदी आहे.