Home बातम्या दिल्ली स्फोटप्रकरणातील आरोपीजसीर वानीच्या कोठडीत वाढ

दिल्ली स्फोटप्रकरणातील आरोपीजसीर वानीच्या कोठडीत वाढ

0

दिल्लीत झालेल्या कारस्फोटप्रकरणी मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आलेल्या जसीर बिलाल वानी याच्या कोठडीत आता आणखी 7 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीच्या एका विशेष न्यायालयाने हा निर्णय सुनावला आहे. जसीर बिलाल सध्या एनआयएच्या कोठडीत आहे. जसीर बिलाल वानीला 27 नोव्हेंबर रोजी अटक झाली होती. त्यानंतर त्याला न्यायालयाने 7 दिवसांच्या एनआयए कोठडी सुनावली होती. जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथील जसीर वानी याने दिल्ली लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या आधी ड्रोनमध्ये काही तांत्रिक बदल करून त्यात स्फोटके लपवून स्फोट घडवण्याची योजना आखली होती.