दिल्ली विधानसभेसाठी भाजपच्या 29 उमेदवारांची यादी जाहीर

0
4

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 29 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मर्लोना यांच्याविरोधात भाजपचे रमेश बिधुडी तर केजरीवालांच्या विरोधात प्रवेश वर्मा यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. गांधीनगरचे विद्यमान आमदार अनिल वाजपेयी यांना तिकीट नाकारले असून कैलाश गहलोत आणि राजकुमार आनंद या आपच्या दोन बंडखोरांना उमेदवारी दिली आहे. तसेच काँग्रेसमधून भाजपवासी झालेले अरविंदर सिंग लवली यांना पक्षाने गांधीनगरमधून उमेदवारी दिली आहे. आम आदमी पक्षाने सर्व 70 तर काँग्रेसने 47 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मुख्यमंत्री आतिशी मर्लोना यांच्याविरोधात काँग्रेसने अल्का लांबा यांना उमेदवारी दिली आहे. आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांमध्ये लढत नवी दिल्ली मतदारसंघात आता तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबात लढत होण्याची चिन्हे आहेत. आप प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. काँग्रेसने दिवंगत माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे चिरंजीव संदीप दीक्षित यांना तर भाजपने दिवंगत माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे चिरंजीव प्रवेश वर्मा यांना उमेदवारी दिली आहे.