दिल्लीसह प्रमुख शहरांत हाय अलर्ट जाहीर

0
80

प्रजासत्ताक दिन सोहळा नजीक असल्याच्या पार्श्‍वभूमीवर गुप्तचर खात्याने राजधानी दिल्लीसह देशातील प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट जाहीर केला आहे. दिल्लीतील जामा मशीद परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाल्यामुळे हा हाय अलर्ट जाहीर करण्यात आला असल्याचे वृत्त आहे.

दिल्ली पोलिसांनी २६ जानेवारीच्या हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली बिलाल अहमद कावा याला शुक्रवारी अटक केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर या हाय अलर्टला महत्व दिले जात आहे. दिल्लीतील जामा मशीद परिसरात तीन संशयित दहशतवादी लपून बसले असून ते प्रजासत्ताक दिनी घातपात घडवून आणण्याची शक्यता गुप्तचर खात्याने वर्तवली आहे.