>> पर्यावरणमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन
एनसीआरमध्ये प्रदूषणाचे संकट अधिक गडद होत चालले आहे. दरम्यान, दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी लोकांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आवाहन केले आहे. एवढेच नाही तर जे लोक ऑफिसला जात आहेत, त्यांनी कार किंवा बाईक शेअर करावी, असे आवाहनही त्यांनी केले. यामुळे कमी वाहने रस्त्यावर येतील.
गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीतील विविध भागात प्रदूषणाची पातळी वाढल्याचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी सांगितले. केवळ दिल्लीतच नाही तर उत्तर प्रदेश, हरियाणामधील अनेक भागातही प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली आहे.
गोपाल राय यांनी भाजपने सीएक्यूएमचा आदेश पाळला नाही. फटाक्यांचे प्रदूषण वाढवण्यावर भाजपचा भर असल्याचा आरोप केला. तसेच त्यांनी नागरिकांना, कुठेही बांधकाम करताना दिसल्यास त्याचा फोटो काढून ग्रीन ऍपवर पाठवा. कोळसा, लाकूड वापरू नका. सोसायटी आणि आरडब्ल्यूए सुरक्षा रक्षकांना इलेक्ट्रिक हिटर प्रदान करा जेणेकरून ते थंडीपासून वाचण्यासाठी उघड्यावर आग लावणार नाहीत असे आवाहन केले.