दिल्लीतील ५३० विमान उड्डाणे पडली लांबणीवर

0
140

>> अत्यंत दाट धुक्याचा परिणाम

कडाक्याच्या थंडीबरोबरच काल दिल्लीत अत्यंत दाट धुके कायम राहिल्याने दिल्ली विमानतळावरील तब्बल ५३० विमान उड्डाणे लांबणीवर पडली, ४० रद्द झाली व २१ उड्डाणे अन्य मार्गे वळविण्यात आली.

इंडिगो एअरलाईन कंपनीने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, दिल्लीतील तसेच उत्तर भारतातील या खराब हवामानामुळे इंडिगोच्या विमान उड्डाणांवर मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर इंडिगोने आपल्या प्रवाशांना घरातून बाहेर पडण्याआधी विमान उड्डाणाविषयीची सद्यस्थिती खातरजमा करण्याचा सल्ला दिला आहे. अन्य विमान सेवा कंपन्यांनीही आपल्या सेवेवर परिणाम झाल्याचे म्हटले आहे. गोएअर, स्पाईस जेट, एअर एशिया, विस्तारा या कंपन्यांनीही ट्विटरवरून या स्थितीविषयी माहिती दिली आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून दिल्लीत गारठणार्‍या थंडीमुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. तर दाट धुक्यामुळे सर्व प्रकारच्या वाहतूक सेवांवर परिणाम झाला आहे.