दाबोळी विमानतळावर १५ लाखांचा माल जप्त

0
79

दाबोळी विमानतळावर कस्टम अधिकार्‍यांनी काल केलेल्या कारवाईत दोघा केरळी नागरिकांकडून ११ लाखांचे सोने, ४.३ लाख रुपयांचा केसर तसेच १५० कार्टून विदेशी बनावटीच्या ५० हजार रुपयांच्या सिगरेट्‌स मिळून साडे पंधरा लाख रुपयांचा माल हस्तगत केला. ओमन फ्लाईट (डब्ल्यूव्हाय २०७) मधून दुबई व्हाया मस्कत मार्गे दाबोळी विमानतळावर उतरलेल्या दोघा केरळी इसमांची झडती घेतली असता त्यांच्या पैकी एकाच्या बॅगेत ३६० ग्राम सोने, ११९ कार्टुन विदेशी बनावटीच्या सिगरेट्‌स सापडल्या. तर दुसर्‍याच्या बॅगेत ४.३ किलोग्राम केसर तसेच ५० कार्टुन विदेशी बनावटीच्या सिगरेट्‌स सापडल्या. सदर इसमांनी सोने मनगटी घड्याळाला तसेच ड्रेस मटेरियलच्या टॉपवर ऍम्ब्रॉयडरीच्या स्वरूपात शिलाई करून आणले होते.