दाऊदवर विषप्रयोग?

0
13

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याविषयी आत्तापर्यंत अनेक बातम्या चर्चेत आल्या. त्यातल्या काही खऱ्या ठरल्या, तर काही फक्त अफवा. यंदा मात्र थेट पाकिस्तानमधील वृत्तवाहिन्या व पत्रकारांकडून दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाल्याचे खळबळजनक वृत्त देण्यात आल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. त्यातच पाकिस्तानमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याचेही सांगितले जात असल्यामुळे दाऊद इब्राहिमची प्रकृती खरेच चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे.
भारताच्या मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीत सर्वात वरच्या क्रमांकावर असणारा दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये असल्याचे अनेक पुरावे भारत सरकारने पाकिस्तान सरकारला दिले आहेत; मात्र तरी देखील दाऊद पाकिस्तानात नसल्याचाच जाप पाकिस्तानमधील सरकार, लष्कर करत राहिले. आता मात्र पाकिस्तानमध्येच दाऊदवर विषप्रयोग करण्यात आल्याचे वृत्त समोर आले असून, त्याला कराचीमधील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आल्याचे बोलले जात आहे. दाऊदची स्थिती गंभीर असून, या संदर्भात पाकिस्तानकडून मात्र कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात
आलेली नाही.