>> वेळापत्रक जाहीर, परीक्षा होणार ऑफलाइन
गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या १३ मे २०२१ मध्ये घेण्यात येणार्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही परीक्षा ऑफलाईन होईल. प्रात्यक्षिक परीक्षा ५ एप्रिल २०२१ पासून सुरू होईल.
या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून १०५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. या परीक्षेसाठी ६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. उशिरा शुल्कासह १९ फेब्रुवारीपर्यंत प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार आहेत. उशिरा शुल्कानंतर ५ मार्च २०२१ पर्यत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. सकाळी ९.३० ते १२ यावेळेत परीक्षा होईल.
राज्यात २९ केंद्रातून ही परीक्षा घेतली जाणार आहे. दहावीच्या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक – १३ मे – संगीत, तबला, हार्मोनियम, गायन, १५ रोजी बेझीक कुकरी, १७ मे – प्रथम भाषा (इंग्रजी, मराठी, उर्दू) , १८ मे – फ्लोरिकल्चर, १९ रोजी – सायन्स, जनरल सायन्स (सीडब्लूएसएन), २० मे – चित्रकला, पेंटिंग (सीडब्लूएसएन), २१ मे – गणित – पातळी -२, २२ मे – गणित – पातळी -१, २४ मे – भाषा द्वितीय (हिंदी), २५ मे – प्री व्होकेशनल विषय, २६ मे – भाषा तृतीय, २७ मे – टेलरिंग अण्ड कटींग (सीडब्लूएसएन) , २८ मे – एनएसक्यूएफ विषय, २९ मे – सोशल सायन्स पेपर – १, इतिहास आणि राज्यशास्त्र (सीडब्लूएसएन), ३१ मे – सोशल सायन्स पेपर -२, भूगोल आणि अर्थशास्त्र (सीडब्लूएसएन), १ जून – वर्ड प्रोसेसिंग (सीडब्लूएसएन), २ जून – डेस्क टॉप पब्लिसिंग (सीडब्लूएसएन), ३ जून – होम व्हेजिटेबल गार्डन (सीडब्लूएसएन), ४ जून – फंडामेंटल ऑफ बेकरी (सीडब्लूएसएन).