विजया नाईक यांना अखेरचा निरोप

0
189

>> मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची श्रद्धांजली, आडपईत लोटला जनसागर

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या पत्नी सौ. विजया नाईक यांना काल गुरुवारी दुपारी आडपई स्मशानभूमीत साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. सकाळी विजयाताईंचा मृतदेह सापेंद्र-रायबंदर येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आला होता, त्यानंतर आडपई येथील त्यांच्या मूळ घरी आणला गेला. विजयाताईंचे पार्थिव आणण्यापूर्वीच लोकांनी अंत्यदर्शनासाठी रांगा केल्या होत्या.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सौ. सुलक्षणा सावंत, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, मनोहर आजगावकर, मंत्री गोविंद गावडे, दीपक पाऊसकर, मिलिंद नाईक, फिलीप नेरी, आमदार रवी नाईक, विजय सरदेसाई, नीळकंठ हळर्णकर, जोशुआ डिसोझा, सुभाष वेलिंगकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, स्मिता पार्सेकर, खासदार विनय तेंडुलकर, माजी खासदार ऍड. नरेंद्र सावईकर, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, माजी आमदार गणेश गावकर, दामू नाईक, किरण कांदोळकर, वासुदेव मेंग गावकर, सतीश धोंड, नगराध्यक्ष विविध स्तरातील मंडळींनी अंत्यदर्शन घेतले. विजयाताईंचे ज्येष्ठ पुत्र सिद्धेश यांनी मंत्राग्नी दिला.

श्रीपाद नाईक निःशब्द…!
श्रीपादभाऊंना त्यांच्या पत्नीच्या निधनाची वार्ता काल सकाळी कुटुंबीयांतर्फे धीर करून सांगण्यात आली, त्यावेळेला भाऊ निःशब्दच झाले.