दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर

0
10

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शनिवार दि. 20 मे रोजी संध्याकाळी 4.30 वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
गोवा शिक्षण मंडळातर्फे दहावीची पहिली सत्र परीक्षा नोव्हेंबर 2022 आणि दुसरी सत्र परीक्षा एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आली. या दोन्ही परीक्षांचा एकत्रित निकाल जाहीर केला जाणार आहे. दहावीची परीक्षा 31 केंद्रांतून घेण्यात आली. राज्यातील सुमारे 20 हजार 476 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यात 10074 मुली आणि 10402 मुलांचा समावेश होता. विशेष विद्यार्थ्यांची संख्या 425 एवढी होती.

शिक्षण मंडळाच्या वेबसाइटवर दहावीचा निकाल उपलब्ध केला जाणार आहे. विद्यार्थी गुणपत्रिका 22 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून स्कूलच्या माध्यमातून डाऊनलोड करून घेऊ शकतात. विद्यालयांना विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका म्हापसा, डिचोली, मडगाव आणि फोंडा या चार केंद्रावर उपलब्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, गतवर्षी दहावी परीक्षेचा निकाल 92.75 टक्के एवढा लागला
होता.