कोलकाता व तामिळनाडूमधून 8 संशयितांना अटक
संशयित पाकिस्तान व बांगलादेशशी संबंधित
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने लष्कर-ए-तोयबाच्या कोलकाता आणि तामिळनाडूतून एकूण 8 संशयितांना अटक केली आहे. या प्रकरणात कोलकाताहून 2 आणि तामिळनाडू येथून सहा आरोपींना अटक झाली. स्पेशल सेल अधिकाऱ्यांच्या मते हे मॉड्युल पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय आणि बांगलादेश अतिरेकी संघटनांच्या इशाऱ्यावर अतिरेकी हल्ल्याची योजना आखत होते. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून 12 हून अधिक मोबाईल फोन आणि 16 सिमकार्ड जप्त केले आहेत. हे आरोपी पाकिस्तानची गुप्तचर संघटना ‘आयएसआयएस’ आणि बांगलादेशातील दहशतवादी संघटनांच्या इशाऱ्यावर काम करत होते.
या आरोपींनी सोशल मीडियावर पाकिस्तानच्या अतिरेकी संघटनांच्या समर्थनार्थ एक पोस्ट टाकण्यात आली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रमोद कुशवाहा यांनी सांगितले की 7 आणि 8 फेब्रुवारी रोजी दिल्ली आणि कोलकाता मेट्रो स्थानकावर पोस्टर्स लावण्यात आले होते, त्यात बुरहान वाणी आणि पाकिस्तानी अतिरेकी संघटनाच्या कारवायांचे समर्थन केले होते. तपासात असे उघडकीस आले की पोस्टर्स लावणारे लोक कोलकातातून दिल्लीत आले होते. 7 फेब्रुवारीला दिल्ली आणि 10 फेब्रुवारीला कोलकातात पोस्टर्स लागली होती.
तामिळनाडूच्या तिरुप्पुरमधून ताब्यात घेतलेल्या 8 संशयितांवर दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचाही आरोप आहे. सर्वजण बनावट आधार कार्ड वापरून आपली ओळख लपवून तिरुप्पुरमधील गारमेंट फॅक्टरीत काम करत होते. एक दिवसापूर्वीच केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी देशातील प्रमुख धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांवर दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेबाबत अलर्ट जारी केला आहे. त्यानंतर दिल्लीतील लाल किल्ला, चांदनी चौकात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
संशयितांत 7 बांग्लादेशी
तामिळनाडूच्या तिरुप्पुर येथून सहा आरोपींना अटक झाली त्यात मिझानुर, मोहम्मद शबात, उमर, मोहम्मद लिटन, मोहम्मद शाहीद आणि मोहम्मद उज्ज्वल यांचा समावेश आहे. हे सर्व तिरुप्पुरच्या गारमेंट इंडस्ट्रीत काम करत होते. आणि ओळख लपवण्यासाठी खोट्या आधारकार्डांचा वापर करत होते. अटक केलेल्या आठ संशयितांत 7 बांगलादेशी नागरिक आहेत. तामिळनाडूत अटक केलेल्या सहा संशयितांवर रेकी केल्याचा आरोप आहे.
जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत
दोन दहशतवाद्यांचा खात्मा
श्रीनगर : रविवारी सकाळी जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड येथील चतरू भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सुरक्षा दलांनी दहशतवादी लपलेल्या ठिकाणाला स्फोटात उडवून दिले असून रात्री उशिरापर्यंत ही चकमक सुरू होती.
पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे दोन ते तीन दहशतवादी तिथे लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली. त्यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यावेळी प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलानेही गोळीबार केला व नंतर सदर ठिकाण स्फोटाने उडवून दिले. यात दोन दहशतवादी ठार झाले.