मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार लष्करे तैयबाचा दहशतवादी झकीऊर रेहमान लखवी याला काल इस्लामाबाद जिल्हा न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सहा वषापूर्वीच्या एक अपहरण प्रकरणातील कलमाखाली लखवी याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. इस्लामाबाद पोलिसांनी सोमवारी त्याच्याविरुध्द अपहरणाचा गुन्हा नोंद केला. त्यानंतर काल त्याला कडेकोट संरक्षणात न्यायालयासमोर उभे करण्यात आले. जिल्हा न्यायाधीश मलिक अमन यांनी यावेळी उभय बाजूंचे युक्तीवाद ऐकून घेतले. दोन दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर लखवीला १ जानेवारी रोजी पुन्हा आपल्यासमोर उभे करावे असा आदेश त्यांनी दिला.