दहशतवादाला पोसणे बंद करा

0
117

>> संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे पाकिस्तानला खडे बोल

पाकिस्तानने आधी दहशतवादाला पोसणे बंद करावे आणि नंतरच परिषदेला यावे अशा शब्दांत संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेत भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क परिषदेत भारताने पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावरून चांगलेच फैलावर घेतले.

मानवी हक्क परिषदेच्या ४६ व्या सत्रात बोलताना भारताच्या स्यायी मिशनचे सचिव पवनकुमार बधे यांनी, आमच्या शेजारील देशाने दहशतवाद्यांना पोसणे व आपल्या देशातील अल्पसंख्याकांचा छळ करणे बंद करूनच या परिषदेला उपस्थित रहावे अशा शब्दांत पाकिस्तानला सुनावले आहे. या व्यासपीठाचा उपयोग पाकिस्तान आतापर्यंत केवळ भारताचा अपप्रचार करण्यासाठीच करत आलेला असून पाकिस्तानने परिषदेचा वेळ घालवणे बंद करावे अशी टीकाही केली.

पाकिस्तान हा दहशतवादाला पाठिंबा देत असल्यामुळे पाकिस्तानात मानवी हक्कांचीही पायमल्ली होत असल्याची नोंद संयुक्त राष्ट्राने घ्यावी अशी मागणी यावेळी भारताने केली.