दरवर्षी २५० जण गमावतात अपघातात प्राण

0
16

>> मुख्यमंत्री; अपघातातील बळींच्या कुटुंबीयांना मदतीचे वितरण

राज्यातील गेल्या दहा वर्षांतील अपघातांच्या आकडेवारीचा आढावा घेतल्यास दरवर्षी सरासरी २५० जणांचा अपघाती मृत्यू होतो. निष्काळजीपणा, मद्याच्या नशेत वाहन चालविणे ही अपघाताची प्रमुख कारणे आहेत. अपघातासाठी केवळ रस्त्यांना जबाबदार धरणे चुकीचे आहे. नागरिक आणि पर्यटकांनी वाहतूक नियम पाळणे तेवढेच आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सांगितले.

राज्यात रस्ता अपघातात बळी पडलेल्या २३ व्यक्तींच्या कुटुंबांना सरकारकडून आर्थिक मदत वितरण केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांची उपस्थिती होती.
अपघातात बळी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना आर्थिक मदत करण्याच्या योजनेखाली आत्तापर्यंत २३२ कुटुंबांना आर्थिक साहाय्य करण्यात आले आहे, असे माविन गुदिन्हो यांनी सांगितले.

राज्यातील प्रमुख रस्ते, चौक, अपघातप्रवण क्षेत्र आदी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव आहे. या व्यवस्थेमुळे रात्रीच्या वेळी सुध्दा वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.