Home बातम्या ‘त्या’ मृत्यू प्रकरणीअखेर गुन्हा दाखल

‘त्या’ मृत्यू प्रकरणीअखेर गुन्हा दाखल

0

हणजूण पोलिसांनी शिवोली येथील सुशांत मनोहर पालयेकर (53) यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गेल्या 5 एप्रिल रोजी संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास सुशांत पालयेकर यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू गुदमरल्याने झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.