सरकारी खर्चाने गेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी सरकारी खर्चाने ब्राझिल दौर्यावर गेलेल्या एक मंत्री व तीन आमदारांनी काल ३७ लाख रुपये सरकारी तिजोरीत जमा केले. हे पैसे फेडणार्यांमध्ये मंत्री आवेर्तान फुर्तादो व बेंल्जामिन सिल्वा व ग्लेन टिकलो या आमदारांचा समावेश आहे.विश्वचषक फुटबॉल स्पर्धेवेळी आर्वेर्तान फुर्तादो, बेंज्लामिन सिल्वा, ग्लेन टिकलो व कार्लोस आल्मेदा हे चार आमदार ब्राझील दौर्यावर गेले होते. त्यांच्याबरोबर अन्य मंत्री व आमदारही या दौर्यावर जाणार होते. मात्र या दौर्यावरून वाद निर्माण झाल्याने वरील चारजण सोडल्यास अन्य आमदारांनी माघार घेतली होती. तर गेलेल्या चारजणांकडून त्यांनी सरकारी तिजोरीतील पैसे वसूल करून घेण्यात येतील असे सरकारने स्पष्ट केले होते.