म्हापसा परिसरातील बोडगेश्वरजवळील मरड परिसरात एका शेतजमिनीत अज्ञात इसमाचा मृतदेह गेल्या 28 मार्च रोजी संशयास्पद स्थितीत आढळला होता. या प्रकरणी काल सायंकाळी 4 वाजता म्हापसा पोलिसांनी सवनखोबा सिंग ऊर्फ चोबा सिंग (43) याला अटक केली.
म्हापसा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नवीन देसाई यांनी दिलेल्या माहिहतीनुसार, सदर मृत व्यक्तीच्या चेहऱ्यावर कोणतीही गंभीर दुखापत आढळली नाही, मात्र त्याचा एक कान कापलेला असल्याचे निदर्शनास आले होते.
संशयित मरड म्हापसा येथे लपून बसल्याची माहिती मिळताच संशयिताला अटक केली.मिळालेल्या माहितीनुसार, मद्य व चिकनाच्या खाद्यावरून त्यांच्यात भांडणे झाली आणि संशयिताने रागाच्या भरात आपल्याच मित्राचा कान चावून त्याला जखमी केले, त्यात तो मरण पावला.