मणिपूर हिंसाचार आणि दिल्ली सेवा विधेयकावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षांचा गदारोळ काल कायम राहिला. या सगळ्या प्रकारामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे प्रचंड नाराज झाले आणि हा गदारोळ थांबत नाही तोपर्यंत आपण लोकसभेत येणारच नाही, अशी भूमिका बिर्ला यांनी घेतली. संसदेत रोज गदारोळ सुरू आहे. जोपर्यंत विरोधी पक्षातले खासदार गोंधळ आणि गदारोळ करणे थांबवणार नाही, तोपर्यंत आपण अध्यक्षांच्या खुर्चीवर बसणार नाही, असे बिर्ला म्हणाले. बिर्ला यांनी ही नाराजी दर्शवल्यामुळे त्यांच्या जागी खासदार पी. व्ही. मिधुन रेड्डी यांनी लोकसभेचे कामकाज पाहिले.