Home बातम्या सरकारतर्फे अंत्योदय अन्न एलपीजी योजना अधिसूचित

सरकारतर्फे अंत्योदय अन्न एलपीजी योजना अधिसूचित

0

नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याने सर्व अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना राज्य सरकारने एलपीजी सिलिंडर योजना अधिसूचित केली असल्याची माहिती दिली आहे. या योजनेखाली अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना एलपीजी खरेदीसाठी दरमहा 275 रुपये मदत म्हणून देण्यात येईल आणि ती रक्कम थेट लाभार्थी कुटुंब प्रमुखांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. वरील बाबी लक्षात घेता राज्यातील सर्व अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या संबंधित तालुका कार्यालयांमार्फत 7 ऑगस्टपूर्वी त्यांचे बँक खाते आणि मोबाईल तपशीलांची तपासणी करण्याची विनंती करण्यात आली आहे.