विधानसभेच्या ३१ जागा तृणमूल कॉंग्रेस, तर ९ जागा मगो लढविणार आहे, अशी माहिती तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी काल दिली. मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची निवड निवडून येणारे आमदार करणार आहेत. तसेच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्याकडून निवडणूक पूर्व आघाडी प्रस्तावाबाबत दिशाभूल केली जात आहे, असा दावा बॅनर्जी यांनी केला.