पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी राजीनामा दिल्यानंतर २४ तासांतच तृणमूलला दुसरा हादरा बसला आहे. तृणमूल कॉंग्रेसमधील पाच स्थानिक नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
तृणमूल कॉंग्रेसच्या मंत्रिमंडळात असलेल्या सुवेंदू अधिकारी यांनी बुधवारी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर १९ डिसेंबरला ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. त्यांच्या पाठोपाठ तृणमूलच्या आणखी पाच स्थानिक नेत्यांनी पक्षाचे राजीनामे दिले आहेत. पक्षामध्ये सन्मान मिळत नसल्याने लोकांची कामे करता येत नाहीत, त्यामुळे राजीनामा देत असल्याचे या नेत्यांनी सांगितले. तृणमूल कॉंग्रेसने भाजपवर नेत्यांना फोडत असल्याचा आरोप करत निशाणा साधला आहे.