मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्याचे मुख्य सचिव आणि संबंधितांना सडये शिवोली येथील पास्टर डॉम्निक डिसोझा आणि त्याची पत्नी जुआन मास्कारेन्हस यांच्या तडीपार आदेशाला आव्हान देणारी याचिका येत्या 26 एप्रिलपूर्वी निकालात काढण्याचा निर्देश काल दिला. उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी सडये शिवोली येथील फाईव्ह पीलर्स चर्चचे पास्टर डॉम्निक डिसोझा आणि त्याची पत्नी जुआन यांच्या तडीपारीचा आदेश जारी केला आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांनी अर्ज दाखल करून डिसोझा याच्या तडीपारीची विनंती केली होती. डिसोझा याने तडीपारीच्या आदेशाच्या विरोधात राज्याच्या मुख्य सचिव आणि संबंधित प्राधिकरणासमोर आव्हान याचिका दाखल केली आहे.