तीर्थयात्रा ही भारताची जिवंत परंपरा ः मोदी

0
28

>> पंतप्रधानांहस्ते केदारनाथ येथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन

आदि शंकराचार्यांनी भारतीय परंपरेत प्राण फुंकले. पिढ्यानपिढ्या गणिताने आपल्याला मार्गदर्शन केले आहे. आदि शंकराचार्यांचे ज्ञान आजच्या काळात अधिक समर्पक आहे. शंकराचार्यांनी जिवंत परंपरा निर्माण केली. तीर्थयात्रा ही भारताची जिवंत परंपरा आहे. बाबा केदार यांच्या दर्शनानंतर प्रत्येक भक्ताला एक नवी ऊर्जा मिळते. जो कल्याण करतो, तो शंकर होय. हे व्याकरणही आचार्य शंकर यांनी थेट प्रमाणित केले होते. त्यांचे जीवन जितके विलक्षण होते तितकेच ते सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी समर्पित होते. भारतीय तत्त्वज्ञान मानवी कल्याणाविषयी भाष्य करते. या सत्याची जाणीव समाजाला करून देण्याचे काम आदि शंकराचार्यांनी केले आहे, असे काल पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी काल शुक्रवारी केदारनाथ धाममध्ये जाऊन तेथील विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी मोदींनी बाबा केदार यांच्या गर्भगृहात १८ मिनिटे प्रार्थना केली. यावेळी त्यांनी म्हैसूर येथील एका शिल्पकाराने बनवलेल्या आदिगुरू शंकराचार्यांच्या १२ फूट उंच आणि ३५ टन वजनाच्या मूर्तीचे अनावरण केले. अनावरणानंतर पंतप्रधानांनी पुतळ्याजवळ बसून पूजा केली. आदिगुरू शंकराचार्य समाधीची मूळ मूर्ती २०१३ मध्ये नैसर्गिक आपत्तीत वाहून गेली होती. यावेळी पंतप्रधान मोदींनी ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पुनर्बांधणी प्रकल्पांचे उद्घाटन केले. त्यावेळी ते संबोधित करत होते.

पुढे बोलताना मोदींनी, आदिगुरूंच्या प्रतिमेच्या जीर्णोद्धाराचे तुम्ही सर्वजण साक्षीदार आहात. काल दीपावलीनिमित्त मी माझ्या सैनिकांसोबत होतो. आज मी सैनिकांच्या भूमीवर आहे. सणाचा आनंद मी माझ्या सैनिकांसोबत साजरा केला आहे. गोवर्धन पूजेच्या दिवशी मला केदारनाथ धाम येथे दर्शन-पूजा करण्याचे भाग्य लाभले आहे. केदारनाथमधील दुर्घटनेनंतर आपले केदार पुन्हा उभे राहू शकेल का, असा प्रश्न लोकांना पडला होता. पण केदारनाथ पूर्ण गौरवाने उभा राहील, असा विश्वास होता आणि माझा विश्वास पूर्ण झाल्याचे समाधान आहे असे मोदी म्हणाले.

पुढे बोलताना मोदींनी, दोनच दिवसांपूर्वी संपूर्ण जगाने अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य उत्सव पाहिला. भारताचे प्राचीन सांस्कृतिक स्वरूप कसे असावे याची आज आपण कल्पना करू शकतो. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशातही काशीला नवसंजीवनी दिली जात आहे. विश्वनाथ धामचे काम अतिशय वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे. आता देश स्वतःसाठी मोठी ध्येये ठेवत आहे. काळाच्या मर्यादेला घाबरणे भारताला मान्य नाही असे सांगून पंतप्रधानांनी पुढे बोलताना, प्रभू श्री राम जन्मभूमीला शतकांनंतर जुने वैभव प्राप्त होत असल्याचे सांगताना २१ दशक हे उत्तराखंडचे आहे. गेल्या १०० वर्षात जेवढे पर्यटक आले आहेत त्यापेक्षा जास्त लोक येत्या १० वर्षात येतील असे सांगितले.