तीन वाहनांच्या विचित्र अपघातात म्हापसा येथे तिघे जखमी

0
82

>> एकाची प्रकृती चिंताजनक

पेडे-म्हापसा येथील वृंदावन इस्पितळाजवळील पेडणे-पणजी महामार्गावर काल दुपारी २.४५ वाजण्याच्या दरम्यान, ट्रक, युको गाडी व मारुती व्हेगनर या तीन वाहनांमध्ये झालेल्या विचित्र अपघातात तीनजण जखमी झाले असून युको वाहनाचा चालक विलास गावडे हा गंभीर आहे. त्याला उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. अन्य दोघा जखमींना पेडे-म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातातील तीनही वाहनांची मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जीए ०३ टी ९५२९ हा ट्रक करासवाड्याहून पणजीकडे जात होता तर जीए ०५ बी ९२३२ ही युको गाडी पणजीहून करासवाडा येथे जात असताना पेडे-म्हापसा येथे ही वाहने पोहोचली असता ट्रकच्या समोर एक गाय आल्याने तिला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाने ट्रक रस्त्याच्या बाजूला घेतल्याने पणजीहून येणार्‍या युको गाडीची व ट्रकची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. याचवेळी पणजीहून करासवाड्याकडे जाणार्‍या जीए ०३ के ००१७ या मारुती व्हेनगरने युको गाडीच्या मागून ठोकर दिली.
या अपघातात युको गाडीचा चालक विलास गावडे हा गंभीर जखमी झाला तर याच गाडीतील डायगो ङ्गर्नांडिस (८०) व इवेत ङ्गर्नांडिस (७०) दोघे किरकोळ जखमी झाली. म्हापसा पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या विलास गावडे याला उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात दाखल केले तर किरकोळ जखमी झालेल्यांना म्हापशातील जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व जखमींना इस्पितळात उपचारासाठी दाखल केले.