तीन पदके निश्‍चित

0
104

सौरव घोषाल, जोश्‍ना चिनप्पा व दीपिका पल्लिकल यांनी आपापले एकेरीचे सा’ने जिंकत स्क्वॉश’ध्ये भारताची तीन पदके निश्‍चित केली. अव्वल ’ानांकित सौरवने उपांत्यपूर्व फेरीत भारताच्याच हरिंदर पाल संधू याचा ९-११, ११-७, ११-७, ११-७ असा पराभव केला. दीपिकाने यानंतर जपानच्या कोबायाशी मिसाकी हिला ११-५, ११-६, ११-८ असे सहज हरविले. जोश्‍नाला मात्र विजयासाठी बराच घाम गाळावा लागला. कडव्या संघर्षानंतर तिने हॉंगकॉंगच्या चान हो लिंग हिला ११-५,१२-१०, ५-११, १२-१० असे हरविले. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या एका सत्रातील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे. चार वर्षांपूर्वी इंचियोनमधील स्पर्धेत सौरवने रौप्य व दीपिकाने कांस्यपदकाची कमाई केली होती.