राज्यातील जिल्हा पंचायतीच्या तीन मतदारसंघात येत्या १६ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. पंचायत सचिव मिनिनो डिसोझा यांनी काल यासंबंधीची अधिसूचना जारी केली. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या रेईश मागूश, दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या दवर्ली आणि कुठ्ठाळी मतदारसंघात निवडणूक घेण्यात येणार आहे. दवर्लीचे जिल्हा पंचायत सदस्य उल्हास तुयेकर आणि कुठ्ठाळीचे जिल्हा पंचायत सदस्य आंतोन वाझ यांची गोवा विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवड झाल्याने त्यांनी जिल्हा पंचायत सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ही पदे रिक्त झाली होती.