तीन ग्रामपंचायतींचे प्रभाग आरक्षण जाहीर

0
21

राज्य निवडणूक आयोगाने पेडणे तालुक्यातील हळर्ण, कासारवर्णे आणि चांदेल-हसापूर या तीन ग्रामपंचायतींच्या येत्या डिसेंबर २०२२ मध्ये होणार्‍या निवडणुकीसाठी एससी, ओबीसी आणि महिलांसाठी प्रभाग आरक्षण जाहीर केले आहे.

हळर्ण पंचायतीमध्ये एकूण ७ प्रभाग असून, एससीसाठी प्रभाग १, ओबीसीसाठी प्रभाग ५ आणि महिलांसाठी २, ६ आणि ७ हे प्रभाग राखीव आहेत. कासारवर्णे पंचायतीमध्ये एकूण ५ प्रभाग असून, ओबीसीसाठी प्रभाग १, महिलांसाठी प्रभाग ४ आणि ५ राखीव आहे, तर चांदेल-हसापूर पंचायतीमध्ये एकूण ५ प्रभाग असून, ओबीसीसाठी प्रभाग ४, महिलांसाठी प्रभाग २ आणि ५ राखीव आहेत.