तिसऱ्या वित्त आयोगाचा अहवाल राज्यपालांकडे

0
7

निवृत्त आयएएस अधिकारी दौलत हवालदार यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या राज्य वित्त आयोगाने आपला अहवाल राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्याकडे काल सुपूर्द केला. राज्य वित्त आयोगाने आपल्या अहवालात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करण्यासाठी विविध उपाय योजनांच्या शिफारशी केल्या आहेत. राज्यपालांकडून हा अहवाल राज्य सरकारकडे पाठविला जाणार असून हा अहवाल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला जाणार आहे. राज्य सरकारने वर्ष 2022 मध्ये राज्य वित्त आयोगाची स्थापना केली होती. राज्यात साधारण 12 वर्षे राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली नव्हती. निवृत्त आयएएस अधिकारी दौलत हवालदार यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वित्त आयोगामध्ये दोन सदस्यांचा समावेश होता. या राज्य वित्त आयोगाने राज्यातील 191 ग्रामपंचायती, 14 नगरपालिका आणि दोन जिल्हा पंचायतींना भेट देऊन त्यांच्या एकूण महसूल व इतर कार्याची माहिती जाणून घेतली.