तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर देशात चौथा सीरो सर्वे होणार

0
108

करोनाच्या तिसर्‍या लाट येण्याच्या पार्श्‍वभूमीवर देशात जूनमध्येच लवकरच चौथा सीरो सर्वे करण्यात येणार आहे. हा सर्वे जूनमध्येच संपवण्यात येणार आहे. याअंतर्गत एकूण २८ हजार नमुने घेतले जातील. त्यात १४ हजार मुले आणि १४ हजार प्रौढांचा समावेश असेल. सर्वेत ग्रामीण भागावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. कोरोनाची तिसरी लाट, ग्रामीण भाग आणि मुलांवर होणार्‍या परिणामांचा विचार करता हा सीरो सर्वे करण्यात येत आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्स म्हणजेच आयसीएमआरच्या अध्यक्षतेखाली हा सर्वे करण्यात येणार आहे. आयसीएमआरकडून करण्यात येणारा हा चौथा सीरो सर्वे आहे. यापूर्वी तीन सर्वे करण्यात आले होते.