ताळगाव पंचायतीसाठी प्रभाग आरक्षण जाहीर

0
3

राज्य निवडणूक आयोगाने ताळगाव ग्रामपंचायतीच्या येत्या 28 एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण काल जाहीर केले. महिलांसाठी चार प्रभाग राखीव ठेवण्यात आले आहेत. या पंचायतीचे एकूण 11 प्रभाग असून त्यातील महिलांसाठी प्रभाग क्रमांक 3, 4, 6 आणि 9 राखीव ठेवण्यात आले आहेत. एसटी प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक 5 आणि मागासवर्गीयांसाठी प्रभाग क्रमांक 1 राखीव ठेवण्यात आला आहे. ताळगाव ग्रामपंचायत मंडळाचा 5 वर्षांचा कार्यकाळ 8 मे 2024 रोजी पूर्ण होत आहे.