ताळगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आणखी पाच जणांनी काल उमेदवारी अर्ज काल दाखल केले. ताळगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आत्तापर्यंत 16 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, गुरुवार दि. 18 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुदत आहे.
ताळगाव ग्रामपंचायतीची 28 एप्रिल 2024 रोजी निवडणूक घेतली जाणार आहे. ताळगाव पंचायतीमध्ये एकूण 11 प्रभाग आहेत. मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या नेतृत्वाखाली गटातर्फे 11 प्रभागांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, ताळगाव पंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 27 ते 29 एप्रिल दरम्यान पंचायत क्षेत्रातील सर्व मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. बार अँड रेस्टॉरंटचा परवाना असलेले व्यावसायिक केवळ रेस्टॉरंट चालू ठेवू शकतात. मद्य विक्री विभाग बंद ठेवावा लागणार आहे, असे आदेशात म्हटले आहे.