तालकांच्या नियुक्ती विरोधात गोवा फॉरवर्डचा इशारा

0
86

चित्रपट निर्माते राजेंद्र तालक यांच्या गोवा मनोरंजन सोसायटीच्या (ईएसजी) उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्याच्या निर्णयाच्या विरोधात आवाज उठविण्याच्या फेडरेशन ऑफ फिल्म फ्रेटर्निटी ऑफ गोवाचे स्वागत करून त्यांना गोवा फॉरवर्डचा पूर्ण पाठिंबा असल्याचे या पक्षाचे प्रवक्ते दुर्गादास कामत यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

वरील मंडळ ताबडतोब बरखास्त करून इफ्फी २०१६ साठी जारी केलेल्या निविदांची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. वरील मंडळात स्थानिक चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश करण्याची गरज आहे. एफएफजीच्या सदस्यांनाही मंडळावर स्थान देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
इफ्फी संदर्भात माहिती हक्क कायद्याखालील सर्व अर्ज आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवापूर्वी निकालात काढण्याची मागणी त्यांनी केली आहे, गोवा मनोरंजन सोसायटी हे भ्रष्टाचाराचे कुरण बनल्याचा आरोपही त्यांनी केला. वरील मंडळावर नव्याने नियुक्ती केलेले उपाध्यक्ष तालक फातोर्ड्याचे माजी आमदार दामोदर नाईक यांच्या मर्जीतीलच असल्याचे कामत यांनी सांगितले. इफ्फीसाठी सजावटीसाठी जारी केलेल्या साडेबारा कोटी रुपयांची चौकशी करण्याची मागणी करून वरील प्रकरणी लोकायुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी उपाध्यक्षांच्या काळात गोवा मनोरंजन सोसायटीमध्ये ४० पेक्षा अधिक कर्मचार्‍यांची भरती केली असून ते सर्वजण सत्ताधारी गटातील असल्याचे कामत यांनी सांगितले.