तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना काही लक्षणे दिसू लागल्याने त्यांची चाचणी करण्यात आली होती. ती पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर आता उपचार सुरु करण्यात आले आहेत. राज्यपालांच्या संपर्कात जे लोक आले होते त्यांचीही कोरोना चाचणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत कावेरी इस्पितळाने माहिती दिली आहे. पुरोहित यांना फारशी लक्षणे दिसत नाहीत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना घरीच क्वारंटाइन करण्यात आले असून त्यांच्यावर डॉक्टरांचे पथक लक्ष ठेवून असल्याचेही इस्पितळाच्या अधिकार्यांनी सांगितले आहे.