जोरदार पावसाची शक्यता

0
130

येथील हवामान विभागाने राज्यात २ ते ५ ऑगस्ट दरम्यान काही भागात जोरदार पाऊस व वार्‍याची शक्यता वर्तविली आहे. राज्यात मागील चोवीस तासांत ०.६४ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत ९१.९२ इंच पावसाची नोंद झाली आहे. पेडणे, काणकोण, ओल्ड गोव्यानंतर आता साखळीत पाऊस इंचाच्या शतकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.