अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीचे प्रकरण चांगलेच तापले आहे. त्यावर विरोधी पक्ष सभागृहात चर्चा करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. या मुद्यावरून विरोधकांनी सोमवारी राज्यसभेतून सभात्याग केला.
चीन आमच्या जमिनीवर कब्जा करत आहे. या विषयावर आपण चर्चाच करणार नाही, तर आणखी कशावर चर्चा करणार? या विषयावर सभागृहात चर्चा करण्यास आम्ही आग्रही आहोत. भारत-चीन सीमा वादावर चर्चा करण्याची नोटीस फेटाळल्यामुळे विरोधी पक्षांनी राज्यसभेतून सभात्याग केला, असे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले. कॉंग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी सोमवारी राज्यसभेत चीन सीमेवर कथित बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला होता.