राज्यातील समलिंगी व्यक्तींवर उपचारासाठी खास केंद्रें सुरू करण्यात येतील अशी जी घोषणा युवा व्यवहार मंत्री रमेश तवडकर यांनी युवा धोरणातून केली आहे तिला राष्ट्रवादी कॉंग्रेस व आम आदमी पार्टीने जोरदार आक्षेप घेतला आहे. तवडकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे.समलिंगी संबंध ठेवणे हा आजार नसून असे संबंध ठेवणार्या व्यक्ती या सामान्य माणसांसारख्याच असतात. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी केंद्रें स्थापण्याची गरजच नाही. वरील प्रकारचे विधान करून रमेश तवडकर यांनी गोव्यासारख्या राज्याचे नाव खराब केल्याचा दावा काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो यानी पत्रकार परिषदेत केला.