… तर मुख्यमंत्री म्हणून सुदिन ढवळीकरांना पसंती

0
111

>> सुभाष वेलिंगकर यांची माहिती

 

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आपल्या गोवा सुरक्षा मंचाबरोबर आल्यास व विधानसभा निवडणुकीत मगोला अधिक जागा मिळाल्यास राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सुदिन ढवळीकर यांचेच नाव गोवा सुरक्षा मंचाला पसंत असेल असे, भारतीय भाषा सुरक्षा मंचाचे प्रमुख नेते प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी सांगितले. शिवसेनेबरोबर निवडणूक युती करण्याचे तत्वता मान्य झाल्यचेही त्यांनी एका प्रश्‍नावर सांगितले. गोवा सुरक्षा मंचाचे काम जोरात सुरू असून गोमंतकीय जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या व प्रत्येकाच्या आत्मविश्‍वासाच्या जोरावरच मंचाने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मंचाच्या हजारो कार्यकर्त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसल्याचे वेलिंगकर यांनी सांगितले.