… तर मरिनाचा प्रस्ताव मागे घेऊ

0
121

>> अहोय मरिनाच्या संचालकांची पत्रकार परिषदेत माहिती

नावशी येथील प्रस्तावित मरिना प्रकल्पात जर काही दोष असल्याचे व या प्रकल्पामुळे स्थानिकांचे नुकसान होणार असल्याचे कुणी दाखवून दिले तर आम्ही आमच्या या प्रकल्पाचा प्रस्ताव मागे घेण्यास तयार आहोत, असे अहोय मरिनाचे संचालक अरुण दुआ यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

या प्रश्‍नी स्थानिक लोकांशी चर्चा करण्यास तयार असल्याचे दुआ यांनी यावेळी सांगितले. स्थानिकांच्या मनात जी भीती आहे. त्यासंबंधी आम्ही हवी तर त्यांच्याशी चर्चा करू, असेही ते म्हणाले. प्रस्तावित मरिनापासून किनारी पर्यावरणाला कोणताही धोका नसल्याचे ते म्हणाले. पर्यावरण, जीवसृष्टी व समुद्री जीव यांना धोका निर्माण होईल असे आम्ही काहीही करणार नसल्याचे ते म्हणाले.