…. तर भाजपचा विजय निश्‍चित

0
87

अमित शाह यांचे वक्तव्य
उत्तर प्रदेशमधील जातीय तणाव कायम राहिल्यास आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय नक्की असल्याचे विधान भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी केले आहे. उत्तर प्रदेशमधील पोलिसांच्या एकतर्फी भूमिकेमुळे राज्यातील जातीय तणाव वाढत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
शाह म्हणाले की महाराष्ट्र व हरयाणात नजीकच्या काळात विधानसभांसाठी निवडणुका होणार आहेत. मात्र त्या दोन्ही राज्यांमध्ये जातीय तणाव नाही. मग उत्तर प्रदेशमध्येच जातीय तणाव कसा काय निर्माण होतो असा सवाल त्यांनी केला. तेथील हा तणाव तसाच राहिला तर तेथे भाजपची सत्ता येईल हे निश्‍चित असा वादग्रस्त दावा त्यांनी केला. कॉंग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजप केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंत ६०० ठिकाणी दंगली झाल्याचा जो आरोप केला होता तो शाह यांनी यावेळी फेटाळून लावला. अलीकडील पोटनिवडणुकांमध्ये जरी भाजपला अपयश आले असले तरी चार राज्यांमध्ये पुढील काळात होणार्‍या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप नक्कीच यश मिळवील असा दावाही त्यांनी केला.