…तर बाबूश यांना राजीनामा द्यावा लागेल

0
94

कोणत्याही पक्षाच्या तिकिटावर एका मतदारसंघात निवडून आलेल्या उमेदवाराला एखाद्या रिक्त झालेल्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची झाल्यास त्याला निवडणूक लढवण्यापूर्वी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागतो, असे संयुक्त निवडणूक अधिकारी नारायण नावती यांनी सांगितले. त्यामुळे सांताक्रुझ मतदारसंघाचे आमदार बाबूश मोन्सेरात याना पणजीतून निवडणूक लढवायची असल्यास आपल्या आमदारकीचा राजीनामा आधी द्यावा लागेल.