तरंगत्या कॅसिनोंवर जुगार खेळतात ९० टक्के गोमंतकीय

0
123

>> पोलिसांची ड्रग्सबाबतही धूळफेक ः बाबूश मोन्सेरात

पणजी शहरातील अमली पदार्थ विक्रीची गंभीर दखल घ्यावी. अमली पदार्थ युवा वर्गाला ङ्गिरत्या विक्रेत्यांकडून युवा वर्गाला अमलीपदार्थ उपलब्ध केला जात आहे. पणजीच्या महापौरांनी उघडकीस आणलेल्या अमली पदार्थ प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आलेली नाही, असे बाबूश मोन्सेरात यांनी विधानसभेत चर्चेत बोलताना काल सांगितले.

कांपाल व इतर परिसरात राहणार्‍या ङ्गिरत्या विक्रेत्यांकडून अमली पदार्थाची खुले आम विक्री केली जात आहे. अमली प्रकरणाच्या तपास प्रकरणी पोलीस यंत्रणेकडून धूळङ्गेक केली जात आहे. पणजी परिसरात गुंडांगिरीच्या प्रमाणात वाढ होत आहे, असेही आमदार मोन्सेरात यांनी सांगितले.
पणजी शहरात भिकार्‍याची संख्या वाढलेली आहे. भिकार्‍यांचा उपद्रव नागरिकांना सहन करावा लागत आहे. शहरात भिकार्‍यांना आणून सोडले जात असल्याचा संशय मोन्सेरात यांनी व्यक्त केला.

मांडवी नदीतील कॅसिनोंवर जुगार खेळण्यासाठी गोमंतकीय मोठ्या संख्येने जातात. सोमवार ते शुक्रवार या दिवसात कॅसिनोवर ९० टक्के गोमंतकीय असतात, असा दावा आमदार मोन्सेरात यांनी केला. मांडवी नदीतील कॅसिनो बाहेर काढण्यासाठी धोरण तयार करण्याची गरज आहे.

ड्रग्समधील व्यक्तींची गय नको ः कामत
राज्यात अमली पदार्थांचा विळखा वाढत चालला असून युवा पिढी या विळख्यात सापडली आहे. अमली पदार्थाच्या व्यवहारात गुंतलेल्या व्यक्तींची गय करू नये, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी विधानसभेत पुरवणी मागणीवरील चर्चेत बोलताना काल केली.

राज्यातील काही भागातील महाविद्यालये, विद्यालयांच्या बाहेर युवकांचे गट ङ्गिरत असतात. त्या युवकांची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. शाळेत शिकणारी एक मुलगी, ङ्गुटबॉल खेळाडू अमली पदार्थाच्या विळख्यात सापडल्याचे वृत्त प्रसिद्ध झालेले आहेत, असेही कामत यांनी सांगितले.

गोव्यातील वेश्या व्यवसाय वाढत आहे. गोवा हे पर्यटनासाठी प्रसिद्ध असून ङ्गॅमिली डेस्टिनेशन म्हणून ओळखले जाते. या पाश्‍वभूमीवर वाढणारा वेश्या व्यवसाय चिंताजनक आहे. गोव्यातील स्थानिक युवती वेश्या व्यवसायात अडकवल्या जात आहेत. वेश्या व्यवसाय बंद पाडण्यासाठी योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे, असेही कामत यांनी सांगितले.