ढवळीकर बंधूंची दिल्लीत धाव;संतोष यांच्याशी युतीबाबत चर्चा

0
7

मगोचे नेते तथा मंत्री सुदिन ढवळीकर आणि मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी काल नवी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेऊन त्यांच्याशी युतीबाबत चर्चा केली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व मंत्री गोविंद गावडे यांनी मगोबरोबरच्या युतीसंबंधी हल्लीच केलेल्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर काल ढवळीकर बंधूंनी दिल्ली गाठून संतोष यांच्याशी युतीबाबत चर्चा केली. विधानसभा निवडणुकीला अजून दोन वर्षे असताना आत्ताच युतीचा विषय का उपस्थित केला जात आहे, असा प्रश्न ढवळीकर बंधूंनी बी. एल. संतोष यांच्यासमोर चर्चेवेळी मांडला. भाजपच्या केंद्रातील नेत्यांच्या शब्दानुसारच मगोने युती केली होती, असेही ढवळीकर बंधूंनी यावेळी संतोष यांना सांगितले.